तसेच प्रयागराज महाकुंभातील चेंगराचेंगरीबद्दल शिवसेना (यूबीटी) प्रवक्ते आनंद दुबे म्हणाले, “याला कोण जबाबदार आहे? प्रशासन हिंदू भाविकांच्या श्रद्धेशी खेळत असल्याचा आरोप करत आनंद दुबे म्हणाले, “प्रशासन फक्त व्हीव्हीआयपींची सेवा करण्यात गुंतले आहे. सामान्य माणसाच्या जीवाला काहीच किंमत नाही. आपल्या हिंदू बांधवांच्या श्रद्धेला काही किंमत नाही का?”आनंद दुबे पुढे म्हणाले, "योगी सरकारने वेळीच धडा घ्यावा आणि महाकुंभाचे आयोजन सैन्याकडे सोपवावे आणि सैन्याची मदत घ्यावी." तसेच, आनंद दुबे यांनी भाविकांना स्नान करताना संयम बाळगण्याचे आणि स्वतःची आणि त्यांच्या सामानाची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.#WATCH | Mumbai | On stampede at Prayagraj Mahakumbh, Shiv Sena (UBT) spokesperson Anand Dubey says, "...Who is responsible for this? We appeal to CM Yogi Adityanath ji to hand over the administration of the Kumbh area to the Army." pic.twitter.com/5T3dZgW5rC
— ANI (@ANI) January 29, 2025