Maha Kumbh stampede news : महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर, आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या निवासस्थानी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. यामध्ये वरिष्ठ पोलिस आणि सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री योगी प्रयागराजसह बनारस आणि अयोध्येत गर्दी नियंत्रणावरही चर्चा करत आहे.
ALSO READ: महाकुंभातील चेंगराचेंगरीत शेकडो लोक बेपत्ता
मौनी अमावस्येला पवित्र स्नानासाठी मोठ्या संख्येने यात्रेकरू आले असताना महाकुंभमेळ्यादरम्यान संगम येथे झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक लोक जखमी झाले आहे तर काहींचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. प्रयागराजला येणाऱ्या अनेक गाड्या वळवण्यात आल्या आहे, पुढील आदेश येईपर्यंत सर्व विशेष गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहे. तसेच प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येच्या दिवशी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन ते प्रयागराजकडे जाणाऱ्या महाकुंभमेळ्याच्या विशेष गाड्यांचे परिचालन सध्या थांबवण्यात आले आहे. त्याच वेळी, वेगवेगळ्या मार्गांवर धावणाऱ्या इतर कुंभमेळ्याच्या विशेष गाड्यांचे परिचालन नेहमीप्रमाणे सुरू आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शनवरून प्रयागराजला येणाऱ्या कुंभमेळ्याच्या विशेष गाड्याच थांबवण्यात आल्या आहे.