नाशिक शहरातून आईला बेशुद्ध करून 3 महिन्यांच्या चिमुकलीचा गळा कापून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकात गंगापूर रोड धृवनगर परिसरात ही घटना घडली आहे. धृवांशी भूषण रोकडे असे या मयत चिमुकलीचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तिचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर सातपूर लिंक रोड जवळ धृव नगर भागात भूषण रोकडे आपल्या पत्नी 3 महिन्यांची चिमुकली आणि आईसह वास्तव्यास आहे. भूषण एका कंपनीत सुपरवायझर आहे. घटनेच्या दिवशी ते कामाला गेले असता घरात त्यांची आई आणि पत्नी होत्या. संध्याकाळी त्यांची आई दूध आणायला बाहेर गेली असता घरात चिमुकली आणि धृवांशी दोघीच होत्या. तेवढ्यात त्यांच्या घरात पंजाबी ड्रेस घालून एक अज्ञात महिला शिरली तिने भूषण यांच्या पत्नीच्या नाकावर रुमाल लावून तिला बेशुद्ध केले आणि नंतर पलंगावर झोपलेल्या चिमुकली धृवांशीचा गळा धारदार शस्त्राने चिरून तिचा खून केला.