अहमदनगर :- विजेचे कनेक्शन कट करण्याच्या कारणावरुन पाच जणांनी वीज कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला घरात घुसून काठी तसेच लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली.ही घटना कारेगाव येथे घडली. याबाबत लखीचंद राठोड यांच्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रताप कांतीलाल कातोरे (वय ३८), हर्षद शामराव धुमाळ (वय २०), शामराव सखाराम धुमाळ (वय ४८ ), अमोल कांतीलाल कातोरे (वय ३४) चौघे (रा.कारेगाव) ओमकार सुरेश नळकांडे , (रा.खंडाळे) या एकूण पाच जणावर गुन्हा पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन जणांना अटक केली असून दोन जण पसार आहेत.
या बाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी सांगितले कि, महावितरणचे तंत्रज्ञ लखीचंद राठोड हे वीज बिल थकबाकीची यादी घेऊन कारेगाव येथील हर्षद धुमाळ यांच्याकडे गेले असता, धुमाळ यास तुमचे वीज बिल भरा नाहीतर
कनेक्शन कट करण्यात येईल, असे सांगितले.
त्यानंतर दि.२२ रोजी लखीचंद्र राठोडच्या फोनवर प्रताप कातोरे यांनी फोन करुन राठोड यास, आमच्या पाहुण्याचे वीजबिल थकले आहे म्हणून तू वीज कनेक्शन कट करणार आहे का?
त्यानंतर प्रताप साकोरे, हर्षद धुमाळ, शामराव धुमाळ, अमोल कातोरे आणि ओंकार नळकांडे हे पाच जण राठोड यांच्या घरी येवून त्यांना मारहाण केली. त्यावेळी तेथे वायरमन संतोष लांडे हे आले. त्यांनी या सवार्ना समजून सांगण्याचा प्रयत्न केला.