महामानवाला वंदन करण्यासाठी दादरमधील चैत्यभूमीवर भीमसैनिकांची गर्दी होते. तर एक सामाजिक उपक्रम म्हणू न या दिवशी महापरिनिर्वाण दिनी सुरु झालेलं ‘एक वही, एक पेन’ अभियान यंदाही राबवण्यात आले आहे. यंदा दोन दिवस हे अभियान राबवण्याचा निर्णय फेसबुक आंबेडकराइट मूव्हमेंट (फ्याम) या संघटनेने घेतला आहे. या उपक्रमातून लाखो विद्यार्थी आणि गरिबांना मदत केली जाते.