आंबा घाट आजपासून वाहतुकीला सुरु

गुरूवार, 5 ऑगस्ट 2021 (16:04 IST)
कोकणात 22 जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे बंद असलेला कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरील  आंबा घाट आजपासून वाहतुकीला सुरु झाला आहे. गेले दहा दिवस हा घाट बंद होता. दरडी बाजूला हटविण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र रस्ता ज्या ठिकाणी खचला आहे त्या ठिकाणी विरुद्ध दिशेला नवीन रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, हलक्या आणि लहान वाहनांसाठी हा मार्ग आजपासून सुरु करण्यात आला आहे.
 
रत्नागिरी जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडण्यासाठी महत्वाचा दुवा असलेला आंबा घाट अतीवृष्टीमुळे रस्ता खचल्यामुळे आणि दरडी  कोसळल्यामुळे वाहतूकीस बंद करण्यात आला होता. 11 दिवस बंद असलेल्या हा घाट रस्ता आजपासून वाहतुकीला सुरु झाला आहे. आंबा घाटात दरड कोसळलेल्या ठिकाणी विविध मशीनचा वापर करून रस्ता करण्याचे काम सुरू करण्यात आले आणि आता तो वाहतुकीला सुरु झालाय. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती