राज्यपालांच्या दौऱ्यांवर मंत्रिमंडळाचा आक्षेप

गुरूवार, 5 ऑगस्ट 2021 (08:47 IST)
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या नियोजित परभणी, हिंगोली व नांदेड दौऱ्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या आढावा बैठका व वसतिगृहांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे तीव्र पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. राज्यपाल कोश्यारी हे राज्य सरकारच्या कामात हस्तक्षेप करत असून दोन सत्ताकेंद्र तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दांत मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली.
 
राज्यपाल  कोश्यारी यांचा नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्य़ांचा तीन दिवसाचा दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यात सरकारच्या अधिकारांचा भंग होत असल्याचा विषय अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित के ला.  नांदेडमध्ये राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विभागाने बांधलेली दोन वसतिगृहे आहेत. त्यांचे पैसे राज्य सरकारने दिले. बांधकाम पूर्ण झाले असून अजून ते विद्यापीठाकडे हस्तांतरित झालेले नाही. त्याचे उद्घाटन करून नंतर विद्यापीठाकडे देणे हा अधिकार राज्य सरकारचा आहे. राज्यपाल कुलपती असल्याने व्यवस्थापनाबाबत त्यांचा अधिकार आहे. पण सरकारने केलेली कामे राज्य सरकारला न विचारता थेट कार्यक्रम आयोजित करणे योग्य नाही अशी नाराजी मलिक यांनी व्यक्त के ली. गेल्या आठवडय़ात राज्यपालांनी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्य़ांमधील पूरग्रस्त भागांना भाजप आमदार आशिष शेलार यांना बरोबर घेऊन दौरा के ला होता. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती