अमळनेर- नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर बालसंस्कार केंद्राचे उद्घाटन

बुधवार, 22 मार्च 2023 (23:43 IST)
मंगल बाल संस्कार केंद्रात चिमुकल्यांनी गिरविले नववर्षाचे धडे 
                     
अमळनेर-: मराठी नववर्षाच्या सुरुवातीला गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मंगळग्रह सेवा संस्था संचलित मंगल बाल संस्कार केंद्राचे येथील समर्थ नगरातील दत्त मंदिरात दि.२२ मार्च रोजी उद्घाटन करण्यात येऊन चिमुकल्यांना नववर्षाचे धडे गिरविण्यात आले.                                      

यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून निवृत्त शिक्षक भास्करराव पाटील,निवृत्त एनसीसी ऑफिसर पद्माकर मुडके, निवृत्त लिपिक गोपाल बडगुजर, अनंत माळी, शोभा माळी यांची उपस्थिती होती. मराठी नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्या ने होत असते भारतीय संस्कृतीत संस्कार महत्त्वाचे असतात, अंधारातून प्रकाशाकडे नेणारी आपली संस्कृती आहे, मात्र आपण यापासून लांब जात आहोत याची जाणीव होण्यासाठी या अभिनव उपक्रमाची सुरुवात मंगल बाल संस्कार केंद्राच्या माध्यमातून करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलानाने झाली. यावेळी मान्यवरांकडून उपस्थित बालगोपालांना नम्रता,आदर, संस्कार याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच विविध गोष्टींच्या माध्यमातून त्यांचे मनोरंजन केले. यावेळी स्वरा पाटील या चिमुरडीने दत्त बानवी म्हणून दाखवीत सर्वांचे लक्ष वेधले. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्या संकल्पनेतून या बालसंस्कार केंद्राची मुहूर्तमेढ करण्यात आली आहे. मुलांना सुसंस्कृत करण्याचा उद्देश्य यामागील आहे. कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष एस.एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त जयश्री साबे यांची उपस्थिती होती. प्रस्तावना दिलीप बहिरम यांनी केली तर आभार गिरीश कुलकर्णी यांनी मानले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती