अनिल देशमुख यांच्यावरील आरोप खरे, मी नार्को टेस्टसाठी तयार असल्याचा परमबीर सिंगचा खुलासा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2024 (08:28 IST)
सध्या महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या मध्ये शाब्दिक युद्ध सुरु आहे. दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्याबाबत खळबळजनक खुलासा केला आहे.
माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी सोमवारी अँटिलिया बॉम्ब हल्ल्याशी संबंधित मनसुख हिरेन खून प्रकरणात देशमुख यांनी आपल्यावर लावलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. सिंग म्हणाले, हे सर्व त्यांचा गैरसमज आहे. ही सर्व त्यांची कल्पना आहे. माझ्यावर केलेले आरोप खोटे आहे. ते नैराश्यमुळे असे करत आहे.
अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री असताना आणि मी त्यांच्यावर आरोप केले होते, तेव्हा त्यांचा मुलगा सलील देशमुख मला मार्च-एप्रिलमध्ये भेटला होता. त्याने हात जोडून माझी माफी मागितली.आणि म्हणाले, देशमुख तुमची माफी मागून तुम्हाला डीजीपी बनवतील. आरोप परत घ्या.
नंतर संजय पांडे यांनी मला कार्यालयात बोलावून खोट्या आरोपात फसवण्याची धमकी दिली. मी फोनवर आमच्यातील संभाषण रेकॉर्ड केले मी सर्वोच्च न्यायालयात आणि सीबीआय समोर हे पुरावे सादर केले.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग म्हणाले, “यानंतर अनिल देशमुख आणि संजय पांडे यांनी अनेक आरोपींना अनिल देशमुख यांच्या बंगल्यावर भेटले. आणि माझ्या विरोधात एफआयआर कशी दाखल करायची योजना आखली.
माझ्यावर दाखल केलेले गुन्हा खोटे आहे.मात्र मी त्यांच्यावर लावलेले आरोप खरे आहे. मी नार्को टेस्टला समोरी जाण्यास तयार आहे. पण अनिल देशमुख, सलील देशमुख आणि संजय पांडे यांची देखील नार्को टेस्ट करावी.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी पोलिस अधिकाऱ्यांना शहरातील बार आणि रेस्टॉरंटमधून दरमहा 100 कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते, असा आरोप केला होता.