राज्यातील सर्व विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईनच होणार

मंगळवार, 26 एप्रिल 2022 (12:17 IST)
सध्या कोरोनाचे प्रादुर्भाव कमी झाले आहे. कोरोनाचे लावलेले निरबंध मागे घेण्यात आले आहे. राज्यात शाळा कॉलेज पूर्ववत सुरु झाले आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन होणार.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आता सर्व विषयांचा परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार. 
 
नागपूर विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी होत होती. आता सर्व परीक्षा ऑफलाईन घेतल्या जाणार असल्यामुळे या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या 2  वर्षांपासून सर्व परीक्षा ऑनलाईन होत होती. आता या वर्षी विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन होणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती