मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी न्यायालयाचा हा निर्णय आला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडीने मोठा विजय मिळवला होता आणि सरकार स्थापनेत सतत कोंडी होत होती. 5 नोव्हेंबर 2024 रोजी, न्यायाधिकरणाने प्राप्तिकर विभागाने दाखल केलेले अपील फेटाळून, पूर्वीचा निर्णय कायम ठेवत आपल्या भूमिकेची पुष्टी केली. या निर्णयामुळे प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी यापूर्वी जप्त केलेल्या मालमत्ता मोकळ्या झाल्या आहे. महाराष्ट्रात आज नवे सरकार स्थापन झाले. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण, मंत्रिमंडळाबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. आता, यावेळी अनोखी बाब म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे नेते म्हणून अजित पवार यांच्या नावावर नवा विक्रम नोंदवला गेला आहे. अजित पवार यांनी आज सहाव्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.