अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस चे नवे अध्यक्ष ? निवडणूक आयोगाकडे 40 आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र सादर

बुधवार, 5 जुलै 2023 (19:31 IST)
अजित पवार हे राज्याचे नवे उपमुख्यमंत्री झाले. अजित पवार यांनी निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळवण्यासाठी दावा केला आहे. अजित पवारांनी 40 आमदारांच्या ठरावाची स्वाक्षरी केल्याचे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाचे सादर केले आहे. या पत्रामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचा ठराव करण्यात आला आहे. या पत्रावर 30 जून तारीख देण्यात आली आहे. दोन्ही बाजूंचे  म्हणणे ऐकल्यावर निर्णय देण्यात येईल असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. 
 
40 आमदारांच्या स्वाक्षरी केल्याचे दस्तऐवज निवडणूक आयोगाकडे सादर केले असून त्यात अजित पवार यांनी सम्पूर्ण राष्ट्रवादी पक्षावर दावा सिद्ध केल्याचे स्पष्ट केले आहे. या पत्रात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या चिन्हावर म्हणजे घडाळ्यावर दावा केला आहे. आता ही लढाई अजित पवार आणि शरद पवार यांना कायदेशीरपणे लढावी लागणार असल्याचे म्हटले जात आहे. 
अजित पवारांनी निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी पक्ष आणि पक्ष चिन्ह आपल्याला मिळावे म्हणून दावा केला आहे. 
 
या पूर्वी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह त्यांना मिळावे म्हणून याचिका निवडणूक आयोगाकडे सादर केली होती. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देण्यात आले. 
 
 
Edited by - Priya Dixit     
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती