कोणत्या देवानं सांगितलं की हाफ पॅंट घालून दर्शन घेऊ नये, अजित पवार यांचा सवाल

शुक्रवार, 19 मे 2023 (22:07 IST)
मुंबई : कोणत्या देवानं सांगितलं की हाफ पॅंट घालून दर्शन घेऊ नये, असा संतप्त सवाल त्यांनी विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी विचारला आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. आता या देवीच्या मंदिरामध्ये 'वेस्टर्न' कपडे परिधान करून येणाऱ्या भाविकांना 'एन्ट्री' बंद करण्यात आली आहे. मंदिर समितीच्या या आदेशावर बोलताना अजित पवारांनी आज एकसिवाव्या शतकात अशा घटना घडतात हे पाहून कमीपणा वाटतो असे म्हटले आहे, ते पत्रकारांशी बोलत होते.
 
दरम्यान, आम्ही शाळेत असताना आम्हाला दहावीपर्यंत हाफ पॅंट घालून यावं लागत होतं. तेव्हा घरचे सांगायचे की तुम्ही अकरावीत गेल्यावर तुम्हाला फुल पॅंट दिली जाईल. ही अशी पद्धत ग्रामीण भागात होती. मुलं हाफ पॅंट घालून आली म्हणून दर्शन घेऊन द्यायचं नाही हे असं कुणी सांगितलं? कोणत्या देवानं सांगितलं हाफ पॅंट घालून दर्शन घेऊ नका? काही जण याचा विपर्यास करत आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती