सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना ओवाळून राखी बांधली. पण, झालं असं की, सुप्रियाताईंनी अजितदादांसाठी टोपी आणली होती, पण ओवळणं झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की, टोपी घालायची राहूनच गेली. त्यामुळे 'अरेच्या टोपी इथंच राहिली' म्हणून अजितदादांनाही हसू आवरले नाही. यावेळी समोरच शरद पवार (NCP Sharad Pawar)सुद्धा बसलेले होते. हा प्रकार पाहून त्यांनाही हसू उमटले. राखी बांधल्यानंतर अजितदादांनी आपल्या या बहिणीचे आशिर्वाद घेतले आणि पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले.