कार्डवर कमिशन घेत नाहीत, आम्ही काय तुमचे जावई आहोत का ? - अजित पवार

गुरूवार, 5 जानेवारी 2017 (09:42 IST)
देश कॅशलेश करत आहत मात्र दुसरीकडे तुम्ही सांगता एक आणि होतय एक. क्रेडीडिट आणि डेबिट स्वाईपवर फी न घ्यायला आपण त्यांचे जावई लागलो का ? असं सांगत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी  मोदी सरकारच्या स्वाईप फ्री योजनेची जोरदार टीका केली आहे.
 
 पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आयांनी  भाजप आणि मोदी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की मोदींनी स्वतःच्या जाहीरातबाजीवर तब्बल अकराशे कोटी खर्च केल्याचा आरोपही त्यांनी केलाय.स्मार्ट सिटीवर बोलताना त्यांनी इडली डोसा खातो पण पिंपरी चिंचवडला स्मार्ट सिटी योजनेत घ्या अशी व्यंकय्या नायडूंना विनवणी केल्याचंही सांगितलं आहे . अजित पवारांनी सत्ताधारी सरकार आणि विरोधाकांवर विशिष्ठ शैलित टीका करत ,उपस्थितांमध्ये चांगलीच करमणूक झाली होती.

वेबदुनिया वर वाचा