उल्हासनगर शहरात आणल्या गेलेल्या विकास आराखड्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

बुधवार, 20 डिसेंबर 2017 (17:38 IST)

उल्हासनगरच्या विकास आराखड्याचा प्रश्न आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार ज्योती कलाी यांनी सभागृहात उपस्थित केला. ३० नोव्हेंबर २०१७ रोजी उल्हासनगर शहरात आणल्या गेलेल्या विकास आराखड्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. शहरात होणाऱ्या ३६ मीटरच्या रिंगरोडमुळे अनेक लोकांना बेघर व्हावे लागणार आहे. या रिंगरोडमुळे व्यापाऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. यामुळे बेरोजगारी वाढण्याचीही भीती आहे. हा विकास आराखडा फक्त बिल्डरांसाठी आखला गेला आहे असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे हा विकास आराखडा रद्द केला जाणार का असा सवाल ज्योती कलानी यांनी उपस्थित केला.

ज्योती कलानी यांच्या मुद्द्यांचे समर्थन करत विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी याविषयी लोकप्रतिनिधी, तज्ज्ञांच्या सहाय्याने प्रश्न मार्गी लावण्याची मागणी सभागृहात केली. यावर अधिवेशनानंतर लवकरात लवकर बैठक लावण्यात येईल असे उत्तर नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती