राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना गेल्या महिन्यात पत्र लिहून अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव शहराशी जुळणारे जावे अशी मागणी केली होती. अहमदनगर शहराचे नाव गेल्या वर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्य सरकारने बदलले होते. या निर्णयाला महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या निर्णयात, अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्या नगर असे करण्यात आले. शहराचे नाव बदल्लयांनंतर अनेक संघटना आणि नागरिक अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी करत होते.