उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकून मी अस्वस्थ, शिर्डीला गेलो आणि मन शांत केलं - केसरकर

शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (07:50 IST)
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांवर टीका केली. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री दीपक केसरकर यांना म्हणाले की, मी उद्धव ठाकरे यांना बघून शिवसेनेत आलो होतो. त्यांची प्रतिमा, त्यांचं चांगलपण बघून मी शिवसेनेत गेलो होतो. पण दसऱ्याच्या मेळाव्यात त्यांचं भाषण ऐकून मी अस्वस्थ झालो. आणि रात्रभर झोपलो नाही. जेव्हा मी अस्वस्थ होतो, तेव्हा शिर्डीला जातो. आणि लगेच शिर्डीला गेलो आणि मन शांत केलं. ईटीव्ही भारतनं ही बातमी दिली आहे.
 
केसरकर पुढे म्हणाले, "मी उद्धव ठाकरे यांच्यावर बोलणार नाही, असे ठरवलं होतं. मात्र ज्या प्रकारे त्यांनी टीका केली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून त्यावर पक्षाच्या प्रवक्ता म्हणून नक्कीच मत मांडेल."
 
यावेळी केसरकर यांना आदिपुरुष चित्रपटावरवर बंदी घालण्याची मागणी राम कदम यांनी केली आहे. याबाबत त्यांना विचारल असता, ते म्हणाले की, "ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, बंदी घालायची की नाही हे ठरवण्यासाठी सेन्सॉर बोर्ड आहे. गृहमंत्री त्याबद्दल निर्णय घेतील."

Published By -Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती