खोटी माहिती पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार

मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (07:49 IST)
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असमुळे आता पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन केला जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागू केल्याने आता राज्यात देखील लॉकडाऊन लागू होणार अशी खोटी माहिती सोशल मिडीयावर पसरवली जात आहे. यावर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खोटी माहिती पसरविण्यांना इशारा दिला आहे. खोटी माहिती पसरविणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे.अनिल देशमुख यांनी ट्विट करत खोटी माहिती पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार असल्याची माहिती दिली. “महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्याही अधिकृत माहितीशिवाय खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत,” असं ट्विट अनिल देशमुख यांनी केलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती