अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्टवर नवरात्रोत्सवात कारवाई सुरु होईल: सोमय्या

गुरूवार, 22 सप्टेंबर 2022 (16:39 IST)
माजी परिवहनमंत्री अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्टवर नवरात्रोत्सवात कारवाई सुरु होईल. दिवाळीपर्यंत हा रिसॉर्ट जमीनदोस्त झालेला असेल, असा दावा आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.
 
उद्या हरित लवादासमोर सुनावणी
परबांच्या दापोली रिसॉर्टप्रकरणी उद्या राष्ट्रीय हरिल लवादासमोर सुनावणी होणार आहे. यासाठी आज किरीट सोमय्या ठाण्याहून दापोलीला रवाना झाले आहेत. त्यापूर्वी त्यांनी रिसॉर्टवरील कारवाईसंदर्भात भाष्य केले.
 
फौजदारी कारवाईला सुरुवात
किरीट सोमय्या म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा उजवा हात समजले जाणारे शिवसेना नेते संजय राऊत सध्या जेलमध्ये आहेत. आता लवकरच उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय म्हटले जाणारे अनिल परब यांच्याविरोधातही फौजदारी कारवाईला सुरुवात होणार आहे.
 
रिसॉर्ट तोडण्याची प्रक्रिया जलद व्हावी
किरीट सोमय्या म्हणाले, अनिल परब यांचा दापोली येथील रिसॉर्ट नवरात्रीत पाडण्यास सुरुवात होणार आहे. दिवाळीपर्यंत हा रिसॉर्ट जमीनदोस्त झालेला असेल. उद्या या रिसॉर्टसंदर्भात राष्ट्रीय हरित लवादासमोर सुनावणी होत आहे. तसेच, या रिसॉर्टवर लवकरात लवकर कारवाई व्हावी यासाठी मी दापोली येथे पोलिस, जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरण विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत आहे, जेणेकरून हे रिसॉर्ट तोडण्याची प्रक्रिया जलद व्हावी.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती