मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची कानउघाडणी केली आहे. माध्यमांसमोर बोलताना जबाबदारीने बोला, असं शिंदेंनी सत्तारांना सांगितलंय. जबाबदारीने वागा, जबाबदारीने काम करा, असा कानमंत्र शिंदेंनी अब्दुल सत्तारांना दिलाय. तसेच यापुढे वादग्रस्त वक्तव्य नकोत, असा सज्जड दमही मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तारांना दिला आहे.
सत्तारांच्या विधानाची राज्य महिला आयोगाने देखील दखल घेतली होती. या प्रकरणावर रान पेटल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सत्तारांची कानउघाडणी केली. तसेच सत्तारांनी पुन्हा वादग्रस्त विधान केलं तर त्यांचं मंत्रिपद धोक्यात येईल, असा इशारा त्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.