१६ वर्षीय मुलाचा दुचाकी आणि कारमध्ये झालेल्या अपघातात मृत्यू

मंगळवार, 23 मे 2017 (12:41 IST)
सुटीत मामाकडे राहण्यास आलेल्या १६ वर्षीय मुलाचा दुचाकी आणि कारमध्ये झालेल्या अपघातात मृत्यू झाला. 
 
ओम प्रवीण देशमुख (वय १६ रा. सोलापूर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.
 
ओम हा त्याच्या मामाकडे उन्हाळ्याच्या सुटीमध्ये पिंपरी चिंचवडला आला होता. दरम्यान, नवी सांगवी येथील फेमस चौकात कारने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. 
 
यामध्ये त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कार चालक फरार झाला आहे. तपास पोलीस करीत आहेत. 

वेबदुनिया वर वाचा