Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणी पुन्हा वाढल्या; आता निवडणूक प्रतिज्ञापत्रावरुन चौकशीचे आदेश

शुक्रवार, 26 ऑगस्ट 2022 (14:50 IST)
कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणी टीईटी प्रकरणानंतर पुन्हा वाढल्या आहेत. सिल्लोड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने निवडणूक प्रतिज्ञापत्रावरुन त्यांच्या चौकशीचे आदेश पोलिसांना दिले. पोलिसांना 60 दिवसांत सखोल चौकशी करून अहवाल द्यायचा आहे. 
 
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी निवडणुकीवेळी दिलेल्या शपथ पत्रात शेतजमीन, बिगरशेती जमीन, वाणिज्य इमारती, निवासी इमारती, शैक्षणिक अहर्तेबाबत तफावत असलेली माहिती सादर केली होती. या बाबतची तक्रार सिल्लोडचे महेश शंकर पेल्ली आणि  पुण्याचे डॉ. अभिषेक हरिदास यांनी अभ्यास करून केली.

या तक्रारीवरून सिल्लोड न्यायालयाने पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. परंतु पोलिसांनी अहवालात भ्रामक आणि त्रुटीयूक्त माहिती देण्याचे फिर्यादींनी सांगितले त्यावरून  सिल्लोड आयल्याने पोलिसांना सखोल चौकशी करून अहवाल 60  दिवसात सादर करण्याचे आदेश दिले आहे. 

अब्दुल सत्तार यांनी सन 2014 आणि 2019 निवडणूक नामनिर्देशन शपथपत्रांमध्ये चुकीची माहिती देण्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावं टीईटी घोटाळ्यात आल्याने मोठी खळबळ उडाली होती. यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले . 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती