अबब! शेतकर्‍याच्या पोटातून काढला एक किलो वजनाचा मुतखडा !

शुक्रवार, 29 जुलै 2022 (14:03 IST)
धुळ्यातील पोटाळी गावातील एका शेतकऱ्याच्या पोटातून तब्बल एक किलो वजनाचा मुतखडा काढण्यात डॉक्टरांना यश मिळाला आहे. डॉ. आशिष पाटील असे या यशस्वी डॉक्टरांचा नाव आहे.डॉक्टरांच्या या यशाची कामगिरीची नोंद इंडिया बुक आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. 
 
भारतातील  झालेली हे आतापर्यँतचं मुतखड्यावरील सर्वात मोठी शस्त्रक्रिया असल्याची माहिती डॉ. आशिष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. रमण चौरे वय 50, रा. नंदुरबार असे शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
 
त्यांना अनेक महिन्यापासून मुतखड्याचा त्रास असल्याने अनेक ठिकाणी जाऊन ही त्यांचे निदान न झाल्याने शेतकऱ्यावर धुळ्यातील  डॉ. आशिष पाटील यांनी तेजनक्ष हॉस्पिटल मध्ये 1 तासाच्या अथक परिश्रमातून शेतकऱ्याच्या कंबरेतून या मुतखड्याला बाहेर काढले. त्यांचे हे यश इंडिया बुक व आशिया बुक ऑफमध्ये नोंदवला गेल्या नंतर डॉक्टर म्हणाले ” हा रेकॉर्ड मुतखड्याच्या पिशवीमधून खडा काढण्याचा झाला आहे. याअगोदरचा विश्वविक्रम 9 सेमीचा होता.” असं डॉक्टर म्हणाले ”आम्हाला 1 तास रुग्णाच्या मुतखड्यापर्यंत पोहोचायला लागले,

त्यानंतर 20-25 मिनीट मुतखडा कंबरेतून काढायला लागले. कारण हा खडा एवढा मोठा होता की तो रुग्णाच्या कंबरेत अडकला होता. रुग्णाची परिस्थिती उत्तम आहे आणि लवकरच तो बरा होऊन त्याला घरी सोडले जाईल असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

पाटील यांना आतापर्यंत दोन गिनीज बुक ऑफ रिकॉर्ड, दोन लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, दोन एशिया बुक ऑफ रेकॉर्ड यासह 21 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. 
 
डॉ. आशिष पाटील म्हणाले की जर तुम्हाला मुतखड्याचा त्रास जाणवू लागला तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. मुतखडा एवाढा मोठा होईपर्यंत वाट पाहू नका त्याने  इतर आजार होऊ शकतात. तुम्ही मुतखड्याचा आजार जास्त काळ अंगावर काढला तर किडनी फेल होऊ शकते, कर्करोग होऊ शकतो त्याचबरोबर किडनीचे अन्य आजार होऊ शकतात असे डॉक्टर म्हणाले आहेत.
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती