याशिवाय कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी जनहित याचिका दाखल करून मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या याचिकेत त्यांनी मंदिराच्या सुरक्षा व्यवस्था केंद्रीय पोलीस राखीव दल किंवा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यांच्या मार्फत देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यावर उच्च न्यायालय तिरुपती देवस्थानच्या सुरक्षेचा अभ्यास करून निर्णय घेणार आहे.
उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायाधीश, अहमदनगर तथा अध्यक्ष यांनी सादर केलेल्या गोपनीय अहवालामधील गंभीर निरीक्षणे लक्षात घेता मंदिराच्या सुरक्षा संदर्भात काही एक बदल न करता सर्व सुरक्षा व्यवस्था प्रधान जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्षांच्या आदेशानुसारच चालेल अथवा बदलेल, असे निर्देश दिले.