नवी मुंबईतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीने प्रियकराच्या मदतीने तरुणीला ब्लॅकमेल करून शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या कॅब चालकाची हातोड्याने मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली आहे.अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. अधिकाऱ्याने सांगितले की,6 एप्रिल रोजी या आरोपी जोडप्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर मध्ये पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. आरोपींना अटक केल्यावर सदर माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण तरुणीला संगमनेर त्याच्या घरी घेऊन केला आणि घडलेले आपल्या कुटुंबियांना सांगितले. कुटुंबीयांनी त्यांना पोलिसांच्या शरण जाण्यास सांगितले तिथे दोघांनी केलेला गुन्हा कबूल केला. त्यांनतर संगमनेर पोलिसांनी मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली. मुंबई पोलीस मयत पांडेच्या घरी गेले असता त्यांना त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून दोन्ही आरोपींना अटक करून नवी मुंबईत आणण्यात आले. ते सध्या 15 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.