जुहू चौपाटीवर होळी खेळायला गेलेल्या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू

मंगळवार, 7 मार्च 2023 (23:20 IST)
जुहू चौपाटीवर होळी खेळणं जीवावर बेतलं धुळवडीच्या निमित्ताने जुहू चौपाटीवर होळी खेळणं तरुणाच्या गटाला भोवलं असून समुद्रात बुडून एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. अंधेरी पश्चिमच्या जुहू चौपाटीच्या समुद्रावर मंगळवारी ही घटना घडली. धुळवडीच्या सणा निमित्त जुहू चौपाटीच्या समुद्रावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पडली होती. संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास 26 वर्षीय तरुण पोहोण्याचा गेला मात्र पाण्याच्या अंदाज त्याला आला नाही आणि तो समुद्रात बुडाला 

त्याला वाचविण्यासाठी पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान आणि इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले बचाव दलाने त्याचा शोध केला आणि त्याला बाहेर काढले त्याला तातडीनं रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.  
 
 
Edited By - Priya Dixit  
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती