कांदिवलीतील पोईसर भागात एक हृदयद्रावक अपघात घडला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. 21 जून रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास कांदिवलीच्या पोईसर भागात एका शिकाऊ कार चालकाने कार चालवताना ब्रेकएवजी एक्सिलेटरवर पाय दिला आणि कार वरील त्याचे नियंत्रण सुटून कार वेगाने पुढे वाढली आणि महिलेसह तिघांना धडकली. या अपघातात तिघे जखमी झाले असून महिलेचा मृत्यू झाला.