मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील नांदेडमध्ये शुक्रवारी एक मोठा अपघात झाला. येथे ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने सहा कामगार बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी शेतमजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर विहिरीत पडला, अशी माहिती पोलिसांनी दिली. रस्त्यात एक विहीर आहे हे ड्रायव्हरला माहीत नव्हते. परिणामी ट्रॅक्टर थेट विहिरीत पडला. बचाव कार्यादरम्यान काही महिलांना पाण्याबाहेर काढण्यात आले आहे. अशी माहिती समोर आली आहे.