अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावतील बाभुळगाव येथे गंगामाई साखर कारखान्याला भीषण आग लागली. कारखान्यातील डिस्टिलरी विभागात ही घटना घडली. कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पाला शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही आग लागली. आगीचे कारण इथेनॉल प्रकल्पाच्या टाक्या फुटल्याचे सांगितले जात आहे. या आगीमध्ये कारखान्याचा मोठा भाग जळून खाक झाला आहे. नेहमी प्रमाणे काम करत असताना डिस्टिलरी विभागाला अचानक आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे गोंधळ उडाला अनेक कामगार जीव मुठीत घेऊन कारख्यातून बाहेर पडले. आगीची घटना घडताच अग्निशमन दलाचा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु झाले.या अपघातात सहा कामगार जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी ठराविक कालावधीत छोटे छोटे स्फोट होत आहे.
सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून कारखान्याच्या परिसरातील नागरिक, कामगार, कर्मचारी यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे.