‘या’तारखेला होणार ‘मविआ’ची भव्य सभा

गुरूवार, 23 मार्च 2023 (21:40 IST)
शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी राज्यभरात एकत्रित सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. दरम्यान शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी राज्यभरात एकत्रित सभा घेण्याची घोषणा केली आहे.
 
विशेष म्हणजे, याची सुरुवात मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरातून होणार आहे. तर या सभेचे यजमानपद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे. त्यामुळे 2 तारखेला होणारी ही सभा यशस्वी करण्यासाठी तिन्ही पक्षाचे नेते कामाला लागले आहेत.
 
दरम्यान या सभेसाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मराठवाडाभर बैठकांचे सत्र चालविले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत ठाकरे कुटुंबांनी गाजवलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा होणार आहे.
 
शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी राज्यभरात एकत्रित सभा घेण्याचा निर्णय घेतला असून, या सभेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले हे प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत.
 
त्यामुळे तिन्ही पक्षाचे महत्वाचे नेते या सभेच्या दृष्टीने कामाला लागले आहेत. तर या सभेची महत्वाची जबाबदारी ठाकरे गटाकडे देण्यात आली आहे. त्यामुळे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्याकडून यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. खैरे आणि दानवे यांच्याकडून मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात यासाठी बैठक देखील घेण्यात येत आहे. त्यामुळे सभेला मोठी गर्दी जमवण्यासाठी मराठवाडभरातून कार्यकर्ते सभेसाठी येणार असल्याचे बोलले जात आहे.
 
दम्यान तिन्ही पक्षांची पहिल्यांदाच एकत्रित मोठी सभा आहे . शिंदे-फडणवीस एकत्र आल्याने राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळले. त्यामुळे राज्यात नव्याने नवीन सरकार आले. मात्र राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगर शहरात महाविकास आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांची एकत्रित भव्य सभा होत आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. विशेष म्हणजे आगामी निवडणूकीच्या दृष्टीने देखील ही सभा महत्वाची समजली जात आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती