माळेगाव येथील शेतकरी रामचंद्र काकड यांच्या शेतात सकाळी ऊसतोड चालू असताना बिबट्याचे तीन बछडे शेतकऱ्यांना सापडले. त्यानंतर त्यांनी याची माहिती वनविभागाला दिली. सायंकाळी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी या तीन बछड्यांना त्याच ठिकाणी टोपली खाली ठेवले.
या ठिकाणी निरीक्षण ठेवण्याकरिता नाईट व्हिजन ट्रॅप कॅमेरा लावला. त्यानंतर काही वेळात मादी तीन पिलांना सुखरूप घेऊन जाताना कॅमेरा मध्ये कैद झाली. वनविभागाचे उपवनसंरक्षक पश्चिम भाग नाशिक पंकज कुमार गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी सिन्नर (प्रा.) मनीषा जाधव यांचे मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीमचे सिन्नर येथील वनपाल एस.एम.बोकडे, श्रीमती व्ही टी कांगणे, मधुकर शिंदे, रोहित लोणारे, रवी चौधरी यांनी ही कामगिरी केली.