राजाराम बंधाऱ्यांसह 6 बंधारे पाण्याखाली, धोकादायक वाहतूक

शनिवार, 8 जुलै 2023 (07:31 IST)
Rajaram dams गेल्या चार दिवसापासून कोल्हापुरात जोरदार पाऊस पडत आहे. पश्चिम भागातील धरण क्षेत्रात पडत असलेपावसाने पंचगंगेच्या पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे नदी दुधडी भरून वाहत आहे. धरण क्षेत्रात झालेल्या दल्या मदार पावसामुळे राजाराम बंधाऱ्याजवळील पंचगंगेची पाणी पातळी 24 फुटांवर गेली असून इशारा पातळी 39 फुटांवर आहे. आज सकाळी राजाराम बंधाऱ्यांसह 6 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.यामुळे राजाराम बंधाऱ्यावर वाहतुक बंद करण्यात आली आहे. मात्र अनेक नागरीक याठिकाणाहून धोकादायक वाहतूक करत आहेत.
 
पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पंचगंगा नदीची पाणी पातळी आणखी वाढणार आहे. पुढच्या 48 तासांत पावसाचा जोर कायम राहिल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जिल्ह्यात पेरणीनंतर पावसाने दडी मारली होती. मात्र गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे यामुळे बळीराजा सुखावला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती