ग्रामसेविकेला लाच घेण्याप्रकरणी 5 वर्षे व पंचवीस हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा

शनिवार, 25 मे 2024 (10:20 IST)
पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत दहा हजार रुपये लाच घेण्याप्रकरणी बारामती तालुक्यात सोनवडी -सुपे येथे एका ग्रामसेविकेला 5 वर्षाची आणि 25 हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा बारामती सत्र न्यायालयाने ठोठावली आहे.दीपाली जगन्नाथ कुतवळ असे या आरोपी ग्रामसेविकेचे नाव आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यात सोनवडी सुपे येथील दीपाली यांनी पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करून देण्यासाठी  2017 मध्ये 10 हजार रुपयांची लाच स्वीकारली.

या प्रकरणी 28 फेब्रुवारी 2017 रोजी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7,13(1)(ड) सह 13(2) या कलमान्वये ला.प.वि. पुणे विभागाकडून बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास पूर्ण करून आरोपीच्या विरोधात दोषारोपपत्र बारामतीच्या न्यायालयात सादर करण्यात आले असून आरोपीवर आरोप सिद्ध झाल्यामुळे ग्रामसेविकेला 5 वर्षाची शिक्षा आणि 25 हजार रुपये द्रव्य दण्डाची शिक्षा बारामती न्यायालयाने ठोठावली आहे. तसेच द्रव्य न भरल्यास अतिरिक्त 6 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. 

Edited by - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती