मंगळवारी काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान 26 जणांचा मृत्यू झाला. या पैकी पाच जण महाराष्ट्रातील रहिवासी होते. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले. हा हल्ल्यात मृत्युमुखी झालेले तीन पर्यटक डोंबिवलीतील आहे. हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने, अशी मृत्युमुखी झालेल्यांची नावे आहे. हे तिघे कुटुंबासह काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते. त्यांच्या मृत्यूची निधनवार्ता समजतातच राहत्या घराच्या परिसरात शोककळा पसरली.
डोंबिवलीतील ठाकूरवाडीभागात राहणारे अतुल मोने, डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदान परिसरातील हेमंत जोशी आणि सुभाष रोड भागातील संजय लेले कुटुंबासह काश्मीरला पर्यटनासाठी गेले असता तिघे मृत्युमुखी झाले आहे. तर दिलीप डिसले आणि अतुल मोने हे देखील मृत्युमुखी झाले आहे.