कोकणातील देवगड येथे पिंपरी-चिंचवडचे फिरायला गेलेल्या 5 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली असून पिंपरी चिंचवडच्या एका खासगी सैनिक अकादमीची 35 विद्यार्थ्यांच्या गटाची सहल देवगड गेली होती. समुद्रात अंघोळीला गेलेल्या पाच विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या मृतकांमध्ये 4 मुलींचा समावेश आहे. तर एक जण अद्याप बेपत्ता आहे. अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे, प्रेरणा डोंगरे असे या मयत मुलींचे नावे आहेत. तर राम डिचोलकर नावाचा विद्यार्थी बेपत्ता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे पाचही जण समुद्रावर पोहण्यासाठी गेले असता बुडाले. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्वांचे मृतदेह ताब्यात घेऊन देवगडच्या ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठविले आहे. रामचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. मुलाचा शोध सुरु आहे.