अमरावती- लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या कुटुंबाचा अपघात झाल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात नांदगावपेठ-देवलगाव रिंगरोडवर घडला. माहितीनुसार ट्रक आणि कार यांची धडक एवढी भीषण होती की, कारचा चुरा झाला तर ट्रकची पुढील दोन्ही चाके निघून गेली. अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला.
अंजनगाव सुर्जी गावातील रहिवासी हे कुटुंब एका लग्न समारंभासाठी वाळगावमार्गे नांदगावपेठ येथे जात असताना पोटे कॉलेजजवळ कार आली असताना चालकाने दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचवेळी विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकशी कारची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की ट्रक विजेच्या खांबाला धडकून रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला जाऊन पडला. तर कारचा चुरा झाला.