आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. दौन वर्षे कोरोना संकट आणि निर्बंधामुळे बंधने होती मात्र यंदा निर्बंध हटल्यामुळे पुन्हा वारकर्यांची मोठी गर्दी होण्याचा अंदाज आहे. अशात आषाढी वारीनिमित्त पंढरपूरसाठी 4700 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली. वारकरी आणि भाविक गर्दीच्या नियोजनासाठी 4 तात्पुरते बसस्थानकही उभारण्यात येणार आहे.
औरंगाबादहून 1200, मुंबईहून 500, नागपूरहून 100, पुण्याहून 1200, नाशिकहून 1000, अमरावतीहून 700 अशा एकूण 4700 विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात येत आहे.
बस स्थानकाचे नियोजन
चंद्रभागा बसस्थानक - मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग व पंढरपूर आगार
भीमा यात्रा देगाव - औरंगाबाद, नागपूर व अमरावती प्रदेश
विठ्ठल कारखाना - नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर
पांडुरंग बसस्थानक - सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग
लाखो भाविक प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एसटीचे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी तसेच अधिकारी वर्गही अहोरात्र कार्यरत राहणार आहेत, अशी माहितीही परब यांनी दिली.