चार पायांचे बाळ

शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017 (14:20 IST)
सिटी हॉस्पिटलमध्ये चार पायांसहीत जन्मलेल्या बाळावर  शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल.  या बाळाचा पुर्नजन्मच झाला आहे. डॉक्टर टेलिमेडिसिनच्या माध्यमातून बाळावर नजर ठेऊन असणार आहेत.  
 
पुलादिनी गावात राहणा-या एका महिलेने या बाळाला जन्म दिला होता. तर रायचूरमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळ होते.. जन्मलेल्या बाळाला एकूण चार पाय असल्याने त्याला बेल्लारीमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सर्वसामान्य आयुष्य जगता यावे यासाठी बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
 
मात्र शस्त्रक्रियेचा खर्च परवडण्यासारखा नसल्याने  बंगळुरूतील नारायणा हेल्थ सिटी सेंटर या मुलाच्या मदतीसाठी धावून आले. या संस्थेने मुलाच्या शस्त्रक्रियेचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतल्यानंतर पालकांनी शस्त्रक्रियेसाठी सहमती दर्शवली. 
 
यानंतर तीन तासांहून अधिक काळ चाललेल्या या शस्त्रक्रियेत मुलाचे जास्तीचे दोन पाय काढण्यात आले. बाळाची तब्येत आता उत्तम आहे.

वेबदुनिया वर वाचा