रशियातील नदीत 4 भारतीय विद्यार्थी बुडाले,सर्वांचे मृतदेह मुंबईत येणार

शनिवार, 8 जून 2024 (20:00 IST)
रशियाच्या वोल्खोव्ह नदीत भारताचे चार विद्यार्थी बुडाले असून सर्वांचे मृतदेह रशियन अधिकाऱ्यांनी बाहेर काढले असून विद्यार्थ्यांचे मृतदेह मुंबईत येणार असून जळगाव येथे त्यांच्या मूळ ठिकाणी नेण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले 4 जून रोजी रशियातील वोल्खोव्ह नदीत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून घटनेच्या दोन दिवसानंतर दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले तर आज सकाळी दोन अजून विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले.हर्षल अनंतराव देसले, जिशान अशपाक पिंजारी, झिया फिरोज पिंजारी, आणि मलिक गुलामगौस मोहम्मद याकूब असे या मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे.

हे सर्वजण वोल्खोव्ह नदीच्या काठावरून चालत असताना पाण्यात पडले आणि बुडाले. जिशान हा आपल्या पालकांसोबत कॉल करत असताना इतर तीन विद्यार्थी नदीत बुडाले. जिशानने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना जोराची लाट आली आणि ते सर्व पाण्यात वाहून गेले.

झिशान पंजारी आणि जिया पंजारी हे दोघे भाऊ बहीण आहे.हे अमळनेरचे रहिवासी होते.तर हर्षल अनंतराव देसले जळगावच्या जिल्ह्यातील भडगावचे रहिवासी  या अपघातात निशा भूपेश सोनावणे बचावली आहे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांचे मृतदेह आज मुंबईत येणार आहे. नंतर त्यांच्या मूळगावी पाठविण्यात येतील.
 
Edited by - Priya Dixit     
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती