कोर्टात पोहोचण्यास ३० मिनिटांचा उशीर, "दोघा पोलिसांना ठोठावण्यात आली लक्षात राहणारी शिक्षा"

बुधवार, 22 नोव्हेंबर 2023 (21:49 IST)
परभणी : न्यायालयात अर्धा तास उशीरा पोहोचलेल्या दोन पोलिसांना न्यायालयाकडून आयुष्यभर लक्षात राहणारी शिक्षा सुनावण्यात आली. ही शिक्षा परभणी इथल्या न्यायालयानं ठोठावली आहे. मानवत पोलीस ठाण्यातील हवालदार आणि पोलीस शिपायाला कोर्टात ३० मिनिटे उशिरा पोहोचले. त्यामुळे दोघांनाही गवत काढायची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील मानवत पोलिस स्टेशनमधील हवालदार आणि हेड कॉन्स्टेबल सुट्टीकालीन कोर्टात ३० मिनिटे उशिरा पोहोचले. त्यामुळे दोघांनाही परिसरातील गवत छाटण्याचे काम सोपवण्यात आले होते. हे दोघे पोलिस रात्रीच्या गस्तीवर होते. त्यांनी रविवार २२ ऑक्टोबर रोजी पहाटे मानवत येथे दोघा जणांना संशयास्पद अवस्थेत फिरताना ताब्यात घेतले. अटकेत असलेल्या दोघांना सकाळी ११ वाजता सुट्टीकालीन न्यायालयासमोर हजर करण्यात येणार होते. मात्र, संशयितांसह पोलिस सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास न्यायालयात पोहोचले.
 
त्यामुळे त्यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांचा रोष ओढवून घेतला. त्यांनी दोघांनाही परिसरातील गवत कापण्याचे आदेश दिले. या असामान्य शिक्षेमुळे अस्वस्थ झालेल्या हवालदारांनी ही बाब त्यांच्या वरिष्ठांना कळवली. त्यानंतर २२ ऑक्‍टोबर रोजी पोलिस स्टेशन डायरीत त्याची अधिकृतपणे नोंद करण्यात आली आणि त्याचा तपशीलवार अहवाल विभागातील उच्चपदस्थांना पाठवण्यात आला. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती