महामार्गावरिल अपघातापैकी 29 टक्के अपघात महाराष्ट्रातून

गुरूवार, 8 सप्टेंबर 2022 (08:41 IST)
मुंबई : 2021 साली राष्ट्रिय महामार्गावर झालेल्या एकूण अपघातापैकी 29 टक्के अपघात महाराष्ट्रातून जाणाऱ्या महामार्गावर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (NCRB) आपल्या अहवालात एकूण 13911 अपघातापैकी 3996 अपघात हे एकट्या महराष्ट्रात घडल्याचे सांगितले आहे.
 
या क्रमवारीत उत्तरप्रदेश पहिल्या क्रमांकावर असून तिथे 7212 अपघात झाले आहेत. त्यापाठोपाठ 5360 अपघातासह तामिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर असून महाराष्ट्राचा 3996 अपघातासह तिसरा क्रमांक लागतो. कोव्हिड काळानंतर 2021मध्ये महाराष्ट्रातील अपघातात 21 टक्क्यांनी घट झाली आहे. कोव्हिडकाळापुर्वी महाराष्ट्रात एकूण 5083 अपघातांची नोद झाली होती.महामार्गावरिल जवळजवळ 4000 अपघाती मृत्युपैकि जास्तीत जास्त मृत्यु हा स्पीड कॅमेरा नसलेल्या महामार्गावर झालेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती