एका दिवसात 28 हजार लोकांनी 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला दिली भेट

सोमवार, 12 नोव्हेंबर 2018 (12:30 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून नर्मदा नदी पात्रात उभारण्यात आलेल्या  'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण केले होते. जगातील सर्वात उंच पुतळा पाहण्यासाठी लोकांची येथे रांग लागली आहे. लोकांनी रॅकॉर्डब्रेक हजेरी लावली आहे. शनिवारी 28 हजार लोकांनी 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला भेट दिली आहे. 
 
31 ऑक्टोबर रोजी 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चा लोकार्पण सोहळा पार पडला होता. त्यानंतर एक नोव्हेंबरपासून सर्वसामान्य लोकांसाठी हा पुतळा खुला करण्यात आला. दररोज येथे हजारो लोक हजेरी लावत आहेत. येथे 28, 409 पर्यटकांनी आपली उपस्थिती दर्शवली. दिवसभरात याधून 48.44 लाख रूपयांची कमाई झाली आहे. आतापर्यंत पर्यटकांकडून 1.26 कोटी रूपये जमा झाले आहेत. दिवाळीमधील सुट्‌ट्यांचा फायदा झाला आहे.
 
नर्मदा नदी पात्रात उभारण्यात आलेल्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चा पुतळा 182 मीटर उंच आहे. पुतळ्यात असलेली लिफ्ट दिवसभरात 5000 लोकांना घेऊन जाते. मूर्तीमध्ये एकावेळी 200 पर्यटक राहू शकतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती