सरकारी अधिकारी असल्याचे सांगत कर्ज मिळवून देत म्हणत व्यावसायिकाची 2 कोटींची फसवणूक

मंगळवार, 30 एप्रिल 2024 (18:30 IST)
अलीकडील लोकंची सायबर फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. बनावट सरकारी अधिकारी असल्याचे सांगून व्यावसायिकाची 2 कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार नवी मुंबई येथे घडला आहे. 
 
नेरुळ नवी मुंबई येथील रहिवासी असलेल्या पीडित व्यावसायिकाला कोविड -19 महामारीच्या काळात व्यवसायात नुकसान झाले. जानेवारी 2021 मध्ये हा व्यवसायीक मुंबईच्या परळ येथे राहणाऱ्या आरोपीच्या संपर्कात आला आणि त्याने स्वतःला केंद्र सरकारच्या आरोग्य विभागात एका मोठ्या अधिकारी असल्याचे सांगितले. 

आरोपीने पीडित व्यावसायिकाला कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. आणि एका बँकेच्या सीईओशी त्याचे चांगले संबंध असल्याचे सांगितले. कर्ज घेण्यासाठी काही गहाण ठेवावे लागणार असं म्हटलं. आमच्या कडे काहीही गहाण ठेवायला नाही. असं पीडित म्हणाले. यावर आरोपीने त्यांना एका दुसऱ्या व्यक्तीबद्दल सांगितले जो स्वतःची संपत्ती गहाण ठेवायला तयार आहे. त्यांनतर कर्ज म्हणून मिळालेली रकम दोघात वाटली जाईल. 

ऑफरचे आमिष दाखवून पीडित व्यावसायिकाने 2 कोटी रुपये आरोपीला दिले. पैसे मिळाल्यावर व्यावसायिकाने कर्ज मागणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला आणि बँकेच्या अधिकाऱ्याला भेटण्याचे म्हटल्यावर आरोपीने टाळाटाळ केली आणि नंतर तो पळून गेला. 

पीडित व्यावसायिकाने रविवारी नेरुळ पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार नोंदवली असून पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलमाखाली फसवणूक करणाऱ्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
 
Edited By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती