कोल्हापूरमध्ये प्रशिक्षणादरम्यान धरणात बुडून 2 कमांडोचा मृत्यू तर 4 जवानांना वाचवण्यात यश

सोमवार, 9 सप्टेंबर 2024 (10:33 IST)
महाराष्ट्रातील कोल्हापूरमधून दु:खद बातमी समोर येत आहे. तिलारी धरणात नदी क्रॉसिंग प्रशिक्षणादरम्यान बेळगावी केंद्राचे दोन कमांडो बुडाले. तर चार जणांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे प्रशिक्षण केंद्रात एकच खळबळ उडाली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडा तालुक्यातील तिलारी धरणावर नदी ओलांडण्याच्या प्रशिक्षणादरम्यान दोन जवानांचा बुडून मृत्यू झाला. तसेच शनिवारी संध्याकाळी ही घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमागील नेमके कारण काय हे शोधण्यासाठी तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजयकुमार दिनवाल वय 28 आणि दिवाकर रॉय वय 26 अशी मृत जवानांची नावे आहे. हे दोन्ही जवान बेळगावी येथील जेएल विंग कमांडो ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेत होते. मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी धरणावर जेएल विंग कमांडो प्रशिक्षण केंद्राचे दोन गट प्रशिक्षणासाठी आले होते. यावेळी सहा सैनिकांचा एक गट नदी ओलांडण्याच्या प्रशिक्षणासाठी बोटीने धरणाच्या मध्यभागी पोहोचला असता त्यांची बोट उलटली.पण बोट उलटण्याचे कारण अजून समजू शकलेले नाही.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती