गोविंद प्रजापती, विपुल राव आणि प्रतापसिंह राव अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे तीन जण प्लास्टिकच्या दोन डब्यांमध्ये दागिने मुंबईतील जव्हेरी बाजारातील एका व्यापा-याकडे घेऊन जात असल्याची माहिती समोर आली आहे. 6 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरू असताना गोविंद प्रजापती हा संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. त्याला ताब्यात घेतले असता, लपूनछपून सोने नेले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला.