गडचिरोलीत भूसुरूंग स्फोट, नक्षलवाद्यांचा सुरक्षा जवानांवर हल्ला, 15 शहीद

बुधवार, 1 मे 2019 (14:51 IST)
गडचिरोलीत जांभूरखेडा या ठिकाणी नक्षलवाद्यांनी CRPF च्या जवानांवर हल्ला केल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यात 15 जवानांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 
1 मे महाराष्ट्र दिन असून या दिवशी हा हल्ला घडून आला. पीएम नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याची निंदा केली आहे. त्यांनी म्हटले की आरोपींना वाचणार नाही. जवनांचा सैनिकांचे बलिदान बेकार जाणार नाही. सूत्रांप्रमाणे आयबीने महाराष्ट्र पोलिसांना नक्षली हल्ल्याबद्दल अलर्ट जारी केले होते.
 
नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाचा स्फोट घडवून आणला आहे. 30 एप्रिलला मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
 
या आधी, नक्षलवाद्यांनी कुरखेडा तालुक्यातील दादापूर गावाजवळ महामार्गाच्या कामावरील तब्बल २७ ते ३० वाहनांसह मिक्सर प्लांटला आग लावून दिल्याचीही घटना घडली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती