तक्रार करणाऱ्या तरुणाला शरद पवारांनी विचारले प्रश्न तरुणाचे तोंड गप्प

माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या राज्यात  दुष्काळ दौरा करत आहेत. त्यांनी काल मुंबई येथे  मतदान केले आणि लगेच  सोलापूर जिल्हयातील दुष्काळी भागात रवाना झाले. त्यांनी  सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी येथील चारा छावणीतील शेतकऱ्यांशी संवाद साधला होता, मात्र यावेळी  अजब किस्सा घडला आहे.
 
 पवार शेतकऱ्यांशी बोलत होते, त्यावेळी  एक  पवारांसोबत बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्याला जेव्हा बोलायला संधी मिळाली तेव्हा तो म्हणाला की  मला कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही तर मी काय करावे असे तो बोलत होता. तेव्हा  तरुण  हातात चांगले घड्याळ , दुचाकी  गाडीची चावी कमरेला लावून आला होता. त्याचे हे रूप  पाहून शरद पवारांनी या तरुणाची चांगलीच फिरकी  घेतली. पवार म्हणाले की “ अरे ही अडकवलेली चावी  कशाची आहे, कोणत्या गाडीची आहे? घड्याळ कुठल्या कंपनीचं आहे?” अशा प्रश्नांची सरबत्ती पवारांनी त्या तरुणावर केली.  हा तरुण त्या ठिकाणी  लाख रुपये किंमत असलेल्या बुलेटवरुन आला होता. पवारांनी प्रश्नांचा भडीमार केल्यावर तरुणाची बोलतीच बंद झाली. पवारांनी एक प्रकारे उपरोधक होत त्याच्या प्रश्नाचे उत्तरच दिले होते. त्यामुळे हा किस्सा तेथे चर्चेचा विषय झाला होता. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती