ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, आचारसंहिता लागू

शनिवार, 12 डिसेंबर 2020 (08:54 IST)
राज्यातील एकूण १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. तर यासाठी १५ जानेवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पार पाडणार असून १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.  
 
त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे. एप्रिल ते जून २०२० रोजी मुदत संपलेल्या १ हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ३१ मार्च २०२० रोजी मतदान होणार होतं. मात्र कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला. त्यानंतर आता ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती