दुष्काळ ग्रस्त भागातील लोकांना शरद पवार यांच्या कडून मोफत १२० जीबी डाटा

सध्या सोशल मीडियावर एक खोटा मेसेज व्हायरल होतोय. या मेसेजमध्ये असं म्हणण्यात आले आहे की, आपला मोबाइल रिचार्ज करू नका कारण खा. शरद पवार यांच्याकडून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत म्हणून १२० जीबी मोबाइल डाटा आणि १०२९ रुपयांचा टॉक टाइम मोफत दिला जाणार आहे. 
 
हा संदेश चार मोबाइल ग्रुपमध्ये पाठवा आणि अवघ्या दोन ते तीन मिनिटात आपला बॅलेन्स चेक करा. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे असे सूचित करण्यात येत आहे की, हा खोटा मेसेज सोशल मीडियावर पसरवला जात असून, आदरणीय पवारसाहेब वा पक्षातर्फे असा कोणताही दावा करण्यात आलेला नाही. हा मेसेज धादांत खोटा असून, कोणीतरी पवारसाहेबांच्या नावाने अपप्रचार करत आहे. 
 
याविरोधात अधिकृत तक्रार डॉ. कपिल झोटिंग, विलास मगरे, विलास ढंगारे यांच्याकडून करण्यात आली आहे. तरी अशा फसव्या मेसेजकडे लक्ष देऊ नये, तसेच यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जनतेस आणि मोबाइल धारकांना करण्यात येत आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती